Baglan Taluka, Maharashtra, India
time : Jan 25, 2025 5:13 AM
duration : 13d 9h 0m
distance : 5.3 km
total_ascent : 491 m
highest_point : 1120 m
avg_speed : 1.6 km/h
user_id : manojdhebe50
user_firstname : Manoj
user_lastname : Dhebe
एका दिवसात केलेल्या आमच्या ३ किल्ल्यांचा ट्रेक - चौल्हेर, साल्हेर आणि सालोटा .
२४ जानेवारी च्या रात्री आम्ही सीएसएमटी ते कसारा लोकल ट्रेनने गेलो आणि २ तासांच्या प्रवासानंतर कसारा ला पोचलो. आमचे विश्वासू ड्रायव्हर शंकर दादा आमच्या बागलाण मोहिनेसाठी गाडी घेऊन तयार च होते. कसारा ते बागलाण २००+ किमीचा प्रवास, गाडी निघाली कसारा घाटाखाली थोडी चहा घेऊन पुढे प्रवास सुरु झाला, गाडीत थोडी झोप घेतली आणि आम्ही पहाटे ४ वाजता चौल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाडी चौल्हेर गावात पोहोचलो. थंड वारा चालू होता थोडी गावात वाट पाहून आम्ही टोर्च हातात घेऊन सकाळी ५ वाजता आमचा ट्रेक मध्यम गतीने सुरू केला आणि काही तासांनी चौल्हेर किल्ल्याच्या मुख्य दरवाजात पोचलो. आम्ही आत प्रवेश करताच, आमचे स्वागत एका भयानक दृश्याने झाले - अंधारात उडणाऱ्या वटवाघळचा थवा, जो एखाद्या भयपटाच्या चित्रपटाची आठवण करून देऊन गेला ! सकाळ झाली तसं सूर्योदयाचे सुंदर मनमोहक दृश्ये डोळ्यात साठवत आणि आम्ही ग्रुप फोटो आणि सूर्योदयाचे फोटो काढले.१०-१५ मिनिटे सूर्यनारायण चे दर्शन करून गप्पा मारत आणि काही शेंगदाणे, चिक्की आणि फळांचा आनंद घेतला. किल्ला एक्सप्लोर करत असताना चारी बाजूने बघितला, एक्सप्लोर झाल्या नतर आम्ही परत बेस व्हिलेजमध्ये उतर असताना आम्ही ट्रेल रन करत उतरलो, साडे तीन तास मधे गडावर जाऊन परत वाडी चौल्हेर ला आलो, तर बेस विलेज मधे एक गाववाले बोले तुम्ही येवढ्या लवकर कसे जाऊन आले त्याना विश्वास होत नव्हता. चौल्हेर किल्ला ऑन-टाइम मधे झाला.
तर साल्हेर आणि सलोटा आपण दुसऱ्या भागात अनुभवू